सर्वप्रथम ही वेबसाईट डिझाइन केल्याबद्दल विश्वस्त मंडळ व वैद्य मनिष जोशी यांचे अभिनंदन. या साईट मुळे सर्व भक्तगण संवाद साधु शकतील.
श्री खम्बांबा माता आमची कुलदेवता. हिंगणी मी सर्व प्रथम सुमारे १४-१५ वर्षापुर्वी ( मी महाविद्दयालयात होतो तेव्हा ) पाहिले. त्या वेळेस मातेचे मंदीर लहान आणि समोर छोटीशी ओसरी असे स्वरुप होते.त्या प्रथम दर्शनातच धन्य झाल्याचा अनुभव आला.
२००१ साली मंदीराचा जीर्णोद्धार झाला आणि नंतर शाकंबरी पोर्णिमेचा उत्सवही सुरु झाला. गेली ३ ते ४ वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनाचा सुवर्णयोग जुळुन येत आहे.
श्री खम्बांबा मातेचे दर्शन घेणे हा एक पुर्व पुण्याईचाच भाग म्हणावा लागेल.अतिशय तेजस्वी आणि जागॄत अशा मुर्तीचे दर्शन घेतल्यावर कॄतकॄत्य होते.
माझा अनुभव आहे की खम्बांबा मातेच्या नुसत्या स्मरणाने माता संकटातून मुक्त करते. माझ्या ऑफिस मधे अन्वयाने देखील संबंध नसतांना अतिशय मोठे संकट येण्याची चाहूल लागली होती आणि माझ्या सारख्या पापभिरु माणसाला भीतीच वाटावी. आतिशय मनोभावे मी देव घरातील श्री खम्बांबा मातेच्या फोटो समोर प्रार्थना केली आणि या संकटातुन विनासायास सोडविण्यासाठी साकडे घातले. मातेची कॄपा झाली आणि अतिशय अलगद पणे ते संकट निघुन गेले.
श्री खम्बांबा माता फक्त प्रापंचिकच नव्हे तर पारमार्थिक उन्नती साठीही कॄपा प्रदान करते हा माझा अनुभव आहे. खम्बांबामातेचे देव्याष्टक पठण केल्याने मानसिक सामर्थ्यात प्रगती झाल्याची अनुभुती येते.
अशी ही श्री खम्बांबा माता आम्हां भक्तांना कायम भक्ति सेवेसाठी प्रेरणा देत राहो, हीच मातेच्ररणी प्रार्थना.
श्री. हेमंत मनोहर जोशी,
सिंहगड रोड, पुणे
भ्रमणध्वनी - ८२३७००२३९२
खंबांबा देवीचा सुखद अनुभव - मुलीच्या लग्नाच्या वेळीचा हा अनुभव आहे.
मुलीसाठी आम्ही वरसंशोधनास सुरुवात केली. साधारण वर्षभर काही जाणवले नाही. पण वर्षभरानंतर मात्र आम्हाला थोडी काळजी वाटायला लागली. म्हणुन आम्ही सह कुटुंब खंबांबा मातेच्या दर्शनास आलो. तिला मुलीच्या लग्नाचे जमावे मणुन साकडे घातले कि “लवकरात लवकर मुलीचा विवाह होऊ दे व चांगले स्थळ मिळू दे. आम्ही तुझी यथासांग पूजा करू.“ मातेचे दर्शन घेऊन आम्ही परत निघत असतांना गावातील एक स्त्री देवीच्या दर्शनास आली. तिने माझ्या मुलीकडे पेन मागितला. माझ्या मुलीने तिला पेन दिला व सोबत तिला नमस्कारही केला. त्या स्त्रीने माझ्या मुलीला “लवकर लग्न होऊ दे” असा आशिर्वाद दिला. खरंतर आमचे त्या स्त्रीशी याविषयी काहीही संभाषण झालेले नव्हते. परंतु तिने स्वतःहून असा आशिर्वाद दिला. आणि आश्चर्य म्हणजे खरोखर दोन महिन्यात माझ्या मुलीचे लग्न ठरले. तिला हवे तसे स्थळही मिळाले. मातेच्या कृपेने आज ते आनंदात संसार करीत आहेत. तिच्या सासरकडील मंडळींनी देखिल समाधानाचे बोल बोलून दाखविलेले आहेत. खंबांबा ही महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीचेच रूप आहे. आमच्या घरी भाद्रपदात तीन दिवस देवीचा उत्सव असतो. त्या उत्सवात माझ्या मुलीने लहानपणापासून मातेची सेवा केली त्याचे चांगले फळ तिला देवीने दिले हेच खरे !
तिच्या सासरीही देवीचा उत्सव साजरा केला जातो. मातेच्या कृपेने तिला एक गोंडस कन्यारत्नही प्राप्त झालेले आहे.
ही सगळी चांगली फळे केवळ आणि केवळ मातेच्या आशिर्वादानेच प्राप्त झाली अशी माझी दृढ भावना आहे. पुढेही अशीच कृपा आम्हांवर मातेने ठेवावी हीच मातेचरणी मनापासून प्रार्थना !!!
सौ. विद्या भोंगे,
देवपूर, धुळे
भ्रमणध्वनी - ९८२२६५८७११