खंबाम्बा माता हिंगणी परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असून अनेक परिवारांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि अन्यत्र उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने दूरवर गेलेल्या भक्तांचे येथे मातेच्या दर्शनासाठी नेमाने येणे होत असते.
हे अतिशय जागृत देवस्थान असून मातेच्या दर्शनाने सुखशांती व समृद्धी प्राप्ती होत असते. यामुळेच हिंगणी या लहानश्या खेडेगावाचे स्थानमाहात्म्य दिवसेंदिवस वृद्धींगतच होत आहे.