अथ कुल संरक्षणीय रवितनयातट निवासिन्यै श्रीखंबांबादेव्यै नमः
( कुलांचे संरक्षण करणा-या व तापीतीरनिवासिनी श्रीखंबाम्बा देवीला प्रणाम असो !) श्रिया क्रियमाणं कलेर्वै सखायं ।
जनषून्नतं दैत्यसंघं सदाहि ॥
निमिषेण तं लीलया संजघान ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥धृ॥
( “श्री”च्या अधिष्ठानाने (स्मरणाने) या लोकांमध्ये प्रत्येकाकडून केले जाणारे कर्म हेच या कलियुगात प्रत्येकाचा साक्षीदार असते. उन्मत्त झालेल्या दैत्यसमूहाला सहजतेने क्षणार्धात ठार करणा-या, प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ धृ ॥ )
कवीन्द्राः कदाचित् सुसंदर्भितुं ते ।
गुणैस्तावकेः कीर्तिमुक्ताफलानि ॥
प्रवृत्ताः पुनर्लज्जितांस्तान् दृष्टा ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥१॥
( हे अंबे ! जगदंबे ! एकदा श्रेष्ठ कविवर्य तुझ्या स्वरूपाचा सुयोग्य संदर्भ शोधण्यासाठी तुझी गुणकिर्ती शब्दबध्द करू लागले. परंतु तू त्यांच्या दृष्टीसमोर प्रगट झालीच नाहीस, म्हणुन ते खजिल झाले. प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ १॥ )
तटे भानुजायां निवासं करोषि ।
प्रकाशे शुभे पश्चिमायां दिशायाम् ॥
अनन्यां स्वभक्तार्चनग्राहशीलाम् ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥२॥
( हे आई ! तू तापी नदीच्या तीरावर, सुक्षेत्र प्रकाशे नजिक, पश्चिम दिशेला निवास करतेस. आपल्या अनन्यभक्तांनी केलेली पूजा स्वीकारणे हा तुझा स्वभावच आहे. अशा प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ २॥ )
मनुष्या-मुनीन्द्रामरेन्द्रादिपूज्याम् ।
उमाजानिसौधस्थितां पूर्वदृष्टिम् ॥
सुपद्मासनां दिव्यहंसेन्दुनेत्रां ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥३॥
( हे अंबे ! मानव श्रेष्ठ मुनिवर, इन्द्रादि देवता या सर्वांना तू पूजनीय आहेस. उमेच्या पित्याची बिरुदावली मिरवणा-या पर्वत पठारावर तुझे वास्तव्य आहे. तुझी दृष्टी पूर्व दिशेला आहे. कमळाच्या शुभ आसनावर तू विराजमान आहेस. तू स्वर्गीय हंसाच्या तसेच चन्द्राच्या कान्तीप्रमाणे तेजस्वी नेत्रांनी युक्त आहेस. अशा प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ ३॥ )
मधु श्रावणाद्यष्टमी भूतभोज्याम् ।
उदारांशुनासां सदा शक्तिहस्ताम् ॥
सुपीतांशुकां हिंगणीग्राम वासाम् ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥४॥
( श्रावण शुध्द अष्टमीला तू ‘मधू’ या स्वर्गीय पेयाचे सेवन केलेस. तरतरीत नासिका, हातांमध्ये शक्तिपूर्ण आयुधे , शुभ असे पीतवस्त्र अशा स्वरूपात तू हिंगणी गावामध्ये निवास करीत आहेस. प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ ४॥ )
सुगंधाढ्य रक्तोत्पलादिप्रसूनाम् ।
प्रवालादि मण्युत्तमाक्रांत देहाम् ॥
सुमुक्ता फलोद्भुतताटंककर्णाम् ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥५॥
( सुगंधाने ओथंबलेल्या लाल कमळातून प्रवाळ व अन्य उत्तमोत्तम मणी उत्पन्न झाले. तुझी मूर्ती अशा मण्यांनी ओतप्रोत भरलेली आहे. तुझे कर्णव्दय उत्तम मोत्यांच्या विभूषणांनी सुशोभित आहेत. अशा प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ ५॥ )
स्वभक्तापकृल्लोंक निष्नीडयन्तीम् ।
क्षुधार्तःकरीन्द्रोयथा चेक्षुदण्डम् ॥
कृपादृष्टिलेशेन मां पाहि देवि (३) ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥६॥
(भूकेने व्याकुळ झालेला गजराज, ऊसाचा संपूर्ण दण्ड समूळ उपटून फस्त करतो त्याप्रमाणे तू तुझ्या भक्तांच्या पातकांचे समूळ उच्चाटन करतेस. हे देवी ! तुझ्या कृपापूर्ण दृष्टीचा लवलेश तरी माझ्यापर्यन्त पोहोचू दे ! ही त्रिवार प्रार्थना आहे. प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ ६॥ )
जगज्जंगमं स्थावरं मृत्युसंज्ञम् ।
सृजस्य त्स्यवरयंबिके त्वं हि नूनम् ॥
अतोमेति मत्वा वंदासोयमायां ।
प्रसन्नामहं त्वां नतोSस्म्यंबखंबे ॥७॥
( हे अंबिके ! मृत्युलोक या नावाचे हे स्थिर – चर स्वरूपी जगत् खरोखर तू निर्माण करतेस. त्याचे पालन करतेस व विनाशही करतेस. म्हणूनच तू उमा ( पार्वती ) आहेस असे मानून हा तुझा दास तुला अभिवादन करीत आहे. प्रसन्नस्वरूपिणी हे अंबखंबा देवी , तुला आम्ही शिरसाष्टांग अभिवादन करतो ॥ ७॥ )
इदं निर्मितं तेSष्टकं त्वत्प्रसादात् ।
स्वबुद्ध्याल्पया तन्मया वामनेन ॥
प्रठेत् श्रावयेत् प्रातरूत्थाय नित्यम् ।
तमाशु प्रसन्नाभवं त्वं सदाहि ॥८॥
( हे भगवति अंबखंबे ! तुझ्या कृपाप्रसादानेच हे तुझे अष्टक रचले गेले आहे. आपली अल्पबुध्दी तुझ्या स्वरूपात तन्मय करून या वामनाने हे अष्टक रचले आहे. नित्य प्रातःकाली उठून जो या अष्टकाचे पठण – श्रवण करील ( करवील) त्याच्यावर तू सतत पूर्ण सुप्रसन्न हो ! ॥ ८ ॥ )
॥ इति वामनाचार्यकृत श्रीखंबांबादेव्याष्टकं संपूर्णम् ॥
॥ श्रीवामनाचार्यांनी रचलेले श्रीखंबांबादेवी अष्टक संपूर्ण झाले ॥
( कुलांचे संरक्षण करणा-या व तापीतीरनिवासिनी श्रीखंबाम्बा देवीला प्रणाम असो !) जय देवी जय देवी जय खंबामाते ।
सर्व शक्ती स्वरूपीणी तु अंबा माते ।
जय देवी जय देवी ॥ धृ ॥
प्रगट झाले रूप खांबातुन ।
हिंगणी ग्रामाला दिले दर्शन ॥ १ ॥
अगाध महिमा वर्णावी किर्ती ।
प्रसन्नतेची दिसे तव मूर्ती ॥ २ ॥
( कुलांचे संरक्षण करणा-या व तापीतीरनिवासिनी श्रीखंबाम्बा देवीला प्रणाम असो !) जय देवी जय देवी जय खंबामाता, जय अंबा माता
आरती करितो देवी जगदंबा ।। धृ ॥
सुरत जिल्ह्यामध्यी हिंगणी गावी
तापी नदीच्या काठी, बेलवृक्षा पाठी
तेथे मंदिरी मयुरारुढ तुझी मूर्ती
तुझ्यासमोरचि ते महादेव नंदी
ऐश्या रम्यस्थळी बैसली खंबामाता
आरती करितो देवी जगदंबा ॥ १ ॥